जिवाशिवाची
बैलजोड लाविल पैजंला आपली कुडं
लाविल पैजंला आपली कुडं नि जिवाभावाचं लिंबलोणनीट चालदे माझी गाडी, दिन-रातीच्या चाकोरीनं
दिन-रातीच्या चाकोरीनं जाया निघाली पैलथडी रं !
डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा
येग रामाच्या बानाचा रं येग बानाचा
तान्या-सर्जाची हं नाम जोडी
कुना हुवीत हाती घोडी माझ्या राजा रं
धरती आभाळाची चाकं, त्याच्या दुनवेची हो गाडी
सुर्व्या-चंदराची हो जोडी, त्याच्या सर्गाची रं माडी, सर्गाची माडी
सती-शंकराची माया, इस्नू लक्षुमीचा राया
पुरुस-परकरतीची जोडी, डाव परपंचाचा मांडी माझ्या राजा रं
No comments:
Post a Comment