Wednesday, April 27, 2016

Tu Sukha Karta Tu - तू सुखकर्ता तू दुःखहर्ता (१)

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता
मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया

ओंकारा तू, तू अधिनायक, चिंतामणी तू, सिद्धिविनायक
मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक
तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता

देवा सरू दे माझे मीपण, तुझ्या दर्शने उजळो जीवन
नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण
सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा

No comments:

Post a Comment