ग साजणी !
कुण्या गावाचि, कुण्या नावाचि, कुण्या राजाचि, तू ग राणी
आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत, हिरव्या रानी
खुळूखुळू घुंगराच्या तालावर झाली दंग
शालू बुट्टेदार लईलई झाला तंग
सोसंना भार घामाघूम झालं अंग
गोर्या रंगाचि, न्यार्या ढंगाचि, चोळि भिंगाचि, ऐन्यावानी
डाळिंबाचं दाणं तुझ्या पिळलं ग व्हटावरी
गुलाबाचं फूल तुझ्या चुरडलं गालांवरी
कबूतर येडं खुळं फिरतया भिरीभिरी
तुझ्या नादानं, झालो बेभान, जीव हैरान, येड्यावानी
कवळ्यात घेऊनीया अलगद उचलावं
मऊमऊ हिरवाळीत दहिंवरात भिजवावं
पिरतीचं बेन तुझ्या काळजात रुजवावं
लाडीगोडीनं, पुढल्या ओढीनं, र्हाउ जोडीनं, राजारानी

No comments:
Post a Comment