Tuesday, May 3, 2016

Mala Ishkachi Ingali Dasali - मला इष्काचि इंगळी डसली

मी एकलीच निजले, रातीच्या अंधारात,
नको तिथंच पडला अवचित माझा हात
हाताखालती नांगा काढुन वैरिण ती बसली
ग बाई मला, इष्काचि इंगळी डसली
बाई ग, बाई ग

मारलि किंकाळी कळ ल‍इ आली
उरिं घामानं भिजली चोळी
अंगाअंगाची काहिली झाली
सांगा ही कळ कसली

सार्‍या घरात फिरले बाई ग
मला औशिद गावलं न्हाई ग
तंवर कुणाची चाहूल आली
खूण खुणेला पटली

ह्या इंगळीचा कळला इंगा
खुळ्यावानि मी घातला पिंगा
मंतर घाला हलकाहलका
नार चुकुन फसली

No comments:

Post a Comment