ऐरणिच्या देवा तुला ठिणगि ठिणगि वाहु
दे
आबाळागत माया तुजी आमावरी र्हाउं दे
लेऊं लेनं गरिबीचं
चनं खाऊं लोखंडाचं
जिनं व्हावं आबरुचं
धनी मातुर माजा देवा, वाघावानी आसुं दे
लक्षुमिच्या हातातली
चवरि व्हावी वरखाली
इडापीडा जाइल, आली-
किरपा तुझी, भात्यातल्या सुरासंगं गाउं दे !
सुख थोडं, दु:ख भारी
दुनिया ही भली-बुरी
घाव बसंल घावावरी
सोसायाला, झुंजायाला, अंगि बळं येउं दे !
आबाळागत माया तुजी आमावरी र्हाउं दे
लेऊं लेनं गरिबीचं
चनं खाऊं लोखंडाचं
जिनं व्हावं आबरुचं
धनी मातुर माजा देवा, वाघावानी आसुं दे
लक्षुमिच्या हातातली
चवरि व्हावी वरखाली
इडापीडा जाइल, आली-
किरपा तुझी, भात्यातल्या सुरासंगं गाउं दे !
सुख थोडं, दु:ख भारी
दुनिया ही भली-बुरी
घाव बसंल घावावरी
सोसायाला, झुंजायाला, अंगि बळं येउं दे !
No comments:
Post a Comment