Tuesday, August 8, 2017

Gulabachi Kali Bagha Haldine Makhali - गूलाबाची कली बघा हल्दीने माखली

गूलाबाची कली बघा हल्दीने माखली
आली लाली गोऱ्या गाली ऊतु ऊतु चालली

नटून थठून लाजते जणू चांदनी
नटून थठून लाजते जणू चांदनी

गूलाबाची कली बघा हल्दीने माखली
आली लाली गोऱ्या गाली ऊतु ऊतु चालली

कोणासाठी कुठे कशी कधी कधी कळेना...
कोण हळूवार गांठ रेशमाची बांधतो
कोण हल्केच तार काळजाचे छेड़तो
कधि कधि देतो कोणी नजरेचा इशारा
कोणी हरपुन देह भान त्यात गुंततो
कोणी हरपुन देह भान त्यात गुंततो

गूलाबाची कली बघा हल्दीने माखली
आली लाली गोऱ्या गाली ऊतु ऊतु चालली

चढ़ते भिड़ते जादू नजरेची अशी
चढ़ते भिड़ते जादू नजरेची अशी
नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते
मन विसरून वाट सैर वैर धावते

गूलाबाची कली बघा हल्दीने माखली
आली लाली गोऱ्या गाली ऊतु ऊतु चालली

Thursday, August 3, 2017

Pori Pinga G Pori PInga - पोरी पिंगा ग पोरी पिंगा


Pori Pinga G Pori Pinga
 पोरी पिंगा  पोरी पिंगा  पोरी पिंगा  पोरी पिंगा !
Pori pinga g Pori Pinga Pinga g Pori pinga !
Tuzya Pingyan mala bolavili, raat jagivili pori pinga ! 
पोरी पिंगा  पोरी पिंगा  पोरी पिंगा  पोरी पिंगा !

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलीरात जागिवली पोरी पिंगा !

फेटा बांधल्याला भाऊ माझा  जावई तुझा  पोरी पिंगा

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलीझोप चाळिवली पोरी पिंगा !

शालू नेसल्याली भैन माझी  सून तुझी  पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलीमागं घालिवली पोरी पिंगा !

भाऊ माझा तो  राजा अग जा जा  पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलीमला बोलिवली पोरी पिंगा !

तुझ्या भावाचं डोळं चकणं रूप हेकणं  पोरी पिंगा
भैन माझी  लेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा !

तुझ्या भैनीचं नाक नकटं  त्वांड चपटं  पोरी पिंगा
माझ्या भावाचा भारी दरारा पळती थरारा सारे पिंगा !

भाऊ तुझा  भितो झुरळालाकाळ्या उंदराला पोरी पिंगा
भैन माझी  जशी कोकिळा गाते मंजुळा पोरी पिंगा !

तुझ्या भैनीचं काय नरडं  कावळं वरडं  पोरी पिंगा
अशा भैनीला कोण आणणार कशी नांदणार पोरी पिंगा !

भैन माझी  जाई बावरून घेई सावरून पोरी पिंगा

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलंलुगडं नेशिवलं पोरी पिंगा ! 

Nach G Ghuma - नाच ग घुमा, कशी मी नाचू ?

नाच घुमा, कशी मी नाचू ?

ह्या गावचा, त्या गावचा सोनार नाही आला
जोडवी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच घुमा !

ह्या गावचा, त्या गावचा शिंपी न्हाई आला
चोळी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच घुमा !

ह्या गावचा, त्या गावचा कासार न्हाई आला
बांगडी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच घुमा !

God Gojiri Laj Lajiri - गोड गोजिरी, लाज लाजरी ताई तू होणार नवरी

God Gojari Laj Lajari
गोड गोजरी लाज लाजरी

God gojari, laaj lajrari taai tu honar navari
Fula fulanchya bandhun malaa mandap ghala g dari
Karkamalanchya dethavarti chuda paachucha vaaje
Haldigunhi pivala bale rang tula to saaje
Nathani-bugadi laaje
Rup pahuni tuze, bandhu taai manimangalsari

Bharjaricha shaalu nesuni zali taai aamuchi gouri
Lagn-mandapi tichya samori ubhi tikadchi swari
Antarpaat sare,
Shiv-parvati vare, ladki hi jaai taai duri


गोड गोजरी, लाज लाजरी ताई तू होणार नवरी
फुलाफुलांच्या बांधुन माळा मंडप घाला दारी

करकमलांच्या देठावरती चुडा पाचुचा वाजे
हळदीहुनही पिवळा बाले रंग तुला तो साजे
नथणी-बुगडी लाजे,
रूप पाहुनी तुझे, बांधु ताई मणिमंगळसरी

भरजरीचा शालू नेसुनी झाली ताई आमुची गौरी
लग्नमंडपी तिच्या समोरी उभी तिकडची स्वारी
अंतरपाट सरे,
शिवा पार्वती वरे, लाडकी ही जाई ताई दुरी
BACK.....

Gana Dhav Re Mana Pav Re - गणा धाव रे मना पाव रे

गणा धाव रे मना पाव रे
तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे

तू दर्शन अम्हांला दाव रे
तुझ्या कृपेची छाया असू दे
ध्यानी-मनी नाम तुझे ठसू दे
गणा धाव रे मना पाव रे
तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे


माझी वादलात सापडली नाव रे
दूर किनारी हाय माझा गाव रे
गणा धाव रे मना पाव रे

तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे

Gajanana Shri Ganaraya - गजानना श्री गणराया

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !

सिंदुरचर्चित धवळे अंग, चंदनउटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया

गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा, अवघी विघ्ने नेसी विलया

Chafa Bole Na Chafa Chalena - चाफा बोलेना, चाफा चालेना

चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना

गेले 'आंब्याच्या' बनी
म्हंटली मैनांसवें गाणी
आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे

गेले केतकिच्या बनी
गंध दरवळला वनी
नागासवें गळाले देहभान रे

चल ये रे, ये रे गड्या
नाचु, उडू घालु फुगड्या
खेळु झिम्मा झिम्पोरी झिम्पोरी झिम्

हे विश्वाचे अंगण
अम्हां दिले आहे आंदण
उणे करू आपण दोघेजण रे

जन विषयाचे किडे
यांची धाव बाह्याकडे
आपण करू शुद्ध रसपान रे

चाफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटुन
कोण मी - चाफा ? कोठे दोघे जण रे ?

Phulale Re Kshan Maze - फुलले रे क्षण माझे फुलले रे

फुलले रे क्षण माझे फुलले रे
मेंदीने, शकुनाच्या.. शकुनाच्या मेंदीने

सजले रे क्षण माझे सजले रे

झुळूक वार्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले
साजण स्पर्शाची जाणिव होऊन, भाळले मन खुळे
या वेडाचे, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरे
मेंदीने.. शकुनाच्या मेंदीने
खुलले रे क्षण माझे खुलले रे

ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे
भांबावल्या माझ्या ऊरात, स्पर्शात, रेशिम काटे तुझे
मनमोराचे, मनमोराचे, जादुभरे हे पिसारे
मेंदीने.. शकुनाच्या मेंदीने
हसले रे क्षण माझे हसले रे

रीत ही, प्रीत ही उमजेना
जडला का जीव हा समजेना
कशी सांगू मी, कशी सांगू मी
माझ्या मनीची कथा रे
मेंदीने.. शकुनाच्या मेंदीने
भुलले रे क्षण माझे भुलले रे

Phad Sambal Turyala G Ala - फड सांभाळ तुर्‍याला ग आला

फड सांभाळ तुर्याला आला
तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा

मूळ जमीन काळं सोनं
त्यात नामांकित रुजलं बियाणं
तुझा ऊस वाढला जोमानं
घाटाघाटानं उभारी धरली
पेरपेरांत साखर भरली
नाही वाढीस जागा उरली
रंग पानांचा हिरवा ओला

लांब रुंद पिकला बिघा
याची कुठवर ठेवशील निगा ?
सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा
याला कुंपण घालशील किती ?
जात चोरांची लई हिकमती
आपली आपण धरावी भीती
अर्ध्या रात्री घालतील घाला

तुला पदरचं सांगत नाही
काल ऐकू आली कोल्हेकुई
पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही
सार्या राती राहील कोण जागं ?
नको बोलण्याचा धरूस राग
बघ चिखलात दिसतात माग

कुणीतरी आला अन्गेला